Thursday, 27 September 2012

साध्या रव्याची इडली

साध्या रव्याची इडली

साहित्य  :-  सादा रवा १ वाटी, आंबट ताक १ वाटी, मीठ चवीनुसार ,खायचा सोडा /बेकिंग सोडा १/४ चमचा

कृती :-
१) रव्यामध्ये ताक, मीठ घालून नीट एकजीव करावे .आणि १-२ तासांसाठी ठेवून द्यावे.
२) इडली करायच्या वेळी त्यात खायचा सोडा घालावा आणि एकत्र करावे .
३) इडली पत्रात हे मिश्रण घालून इडल्या करून घ्यावात.

टीप :-
१) जर पीठ भिजवण्यासाठी वेळ नसेल तर फक्त रवा छान फुलून येईपर्यंत ठेवावा.