Friday, 28 September 2012

उडीद वडे /मेदू वडे

उडीद वडे /मेदू वडे

साहित्य :-
 उडीद डाळ ३ वाटी, तांदूळ १ वाटी, हिरव्या मिरचीचे काप ४ चमचे , पातळ काप केलेलं ओले खोबरे , चवीनुसार मीठ , तळण्यासाठी तेल.

कृती :-
१) उडीद डाळ आणि तांदूळ वेग वेगळे ३-४ तासांसाठी भिजत घालावेत .
२) नंतर उडीद डाळ आणि तांदूळ कमी पाण्याचा वापर करून मिक्सर वर वाटून घ्यावेत.(टीप)
३) दोन्ही मिश्रण एकजीव करावेत आणि त्यात चवीनुसार मीठ , हिरव्या मिरचीचे आणि ओल्या खोबऱ्याचे काप घालावेत.
४) तयार मिश्रण उडीद वड्याच्या साच्यात घालून वडे तळून घ्यावेत.
५) तयार वडे सांबर सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खायला द्यावेत.

टीप :-
१) मिश्रण बारीक करत असताना पाण्याचा जास्त वापर करू नये .त्यामुळे वड्यांना नीट आकार येत नाही.
२) जर वड्याचा साचा नसेल तर गोल गोल भज्याप्रमाणे वडे करावेत .