Thursday, 27 September 2012

पावभाजी

पावभाजी
साहित्य :- बारीक चिरलेला फ्लोवेर १ वाटी, बारीक चिरलेला बटाटा १ वाटी, बारीक चिरलेली शिमला मिरची १ वाटी, बारीक चिरलेला बटाटा कांदा १ वाटी , बारीक चिरलेला बटाटा टोमटो १ वाटी  भिजवलेले वाटणे / मटार १ वाटी ,२ चमचे लाल तिखट , सुहाना पावभाजी मसाला २ चमचे, मीठ चवीनुसार , तेल
मसाल्या साठी :- कांदे २, टोमटो ३, आल १ इंच , लसून १०-१५ पाकळ्या ,२-३ हिरव्या मिरच्या,कोथिंबीर  हे सगळे एकत्र करून वाटण तयार करून घ्यावे.

कृती :-
१) जर तुम्ही भिजवलेले हिरवे वाटणे वापरणार असाल तर प्रथम भिजवलेले वाटणे हळद घालून कुकर ला ४ शिट्या करून घ्याव्यात .आणि ते गार झाल्यावर त्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा २-३ शिट्या घ्याव्यात .
२) पातेले गरम झाले कि त्यात पळीभर तेल घालून,तेल गरम झाल्यावर त्यात वरील मसाला घालून छान परतून घ्यावे. मसाल्याच्या बाजूने तेल परतू पर्यंत परतावे .नंतर त्यात लाल तिखट , पावभाजी मसाला ,चवीनुसार मीठ ,आणि किंचित साखर घालावी आणि पुन्हा छान परतावे .तेल सुटू लागल्यवर त्यात वरील शिजवलेल्या भाज्यांचे मिश्रण घालावे.(टीप १)
३) सगळे नीट परतून घ्यावे.
४) तयार आहे गरमागरम पावभाजी.

टीप:-
१) जर सर्वे भाज्या बारीक चिरून घेतल्या तर त्या छान शिजल्या जातात व पुन्हा घोटत बसावे लागत नाही.
२) जर तुम्ही मटार वापरणार असाल तर सगळ्या भाज्या एकत्र कुकर ला लावल्या तरी चालतात .