दुधी भोपळ्याची खीर
साहित्य :- दुधी भोपळ्याचा खीस १ वाटी ,साखर १ वाटी,दुध २ वाट्या ,तूप ४ चमचे ,वेलची पूड, ड्रायफ्रुट्स सजावटी साठी
कृती :-
१) प्रथम दुधी भोपळ धुवून,किसून घ्यावा .
२) पातेल्यात तूप गरम करावे आणि त्यात तो कीस चांगला परतून घ्यावा आणि त्यात दुध घालून उकळी काढावी आणि थोडा वेळ शिजू द्यावे .
३) छान शिजले कि त्यात साखर, ड्रायफ्रुट्स ,वेलची पूड घालावी .
४) गरमा गरम सर्व्ह करावे
टीप :-
१) कोणत्याही खिरीसाठी दुध हे शक्यतो बिन पाणी घातलेलेच वापरावे त्याने खिरीला चव छान येते .