रवा- शेवयाची खीर
साहित्य :- रवा १/२ वाटी, शेवया १ वाटी , तूप १/२ वाटी,साखर १.५ वाटी ( चवीनुसार कमी जास्त करू शकता ), वेलची पूड ,ड्रायफ्रुट्स , घट्ट दुध ३वाट्या .
कृती :-
१) रवा आणि शेवया तुपावर छान परतून घ्याव्यात आणि त्यात दुध घालून चांगले शिजू द्यावे .
२) चांगले शिजल्यावर त्यात साखर, वेलची ,ड्रायफ्रुट्स घालावेत .
३) तयार खीर वाढताना त्यात थोडे तूप घालून ध्यावी .
टीप :-
१) कोणतीही खीर करताना पाण्याचा वापर कमी करावा त्यामुळे खिरीला खूप छान चव येते .
फक्त गव्ह्याच्या खिरीमध्ये खीर शिजवताना पाणी बाकी खिरी पेक्षा जास्त लागते .