तांदुळाची खीर
साहित्य :- तुकडा तांदूळ २ वाटी, दुध १ लिटर ,साखर २ वाटी (आवडी नुसार कमी जास्त करू शकता ) ,तूप अर्धी वाटी ,ड्रायफ्रुट्स,वेलची पूड
कृती:-
१) प्रथम तांदूळ तुपावर छान परतून घ्यावा आणि नंतर त्यात दुध घालून बारीक गैस करून आटु द्यावे म्हणजेच त्या दुधात तो भात पूर्णपणे शिजू द्यावा .
२) नंतर त्या शिजलेल्या तांदळात साखर घालून शिजू द्यावे.
३) सर्वात शेवटी वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालावेत.
टीप :-
१) भात दुधात शिजल्यानंतर पाहावे कि तांदूळ खूप दिसतोय का आणि जर दिसत असेल तर मग त्यातील थोडे मिश्रण मिक्सर ला फिरवून घ्यायचे आणि त्यात मिक्स करावे सगळे मिक्सर ला फिरवू नये.आणि नंतर चवीनुसार साखर घालावी .