गव्हाची खीर
साहित्य :- खपली गहू २ वाटी, गुळा १ वाटी, वेलीची पूड चिमुटभर ,ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी
कृती :-
१) ही खीर करण्यासाठी प्रथम गहू उकळलेल्या पाण्यात ८-१० तास भिजत घालावेत.
२)नंतर छोट्या कुकर मध्ये तूप घालावे आणि त्यात तुकडा तांदूळ १/२ वाटी छान परतावा आणि मग त्यात भिजवलेले गहू घालावेत आणि ८-१० कुकरच्या शिट्या घ्याव्यात .
३)त्या नंतर मोठ्या पातेल्यात कुकर मधील सर्वे मिश्रण घालावे आणि त्यात ड्रायफ्रुट्स घालावेत आणि मग त्यात खिसलेला गुल घालावा आणि चांगले शिजू द्यावे .
४)बाउल मध्ये काढून त्यात दुध आणि तूप घालून सर्व्ह करावे .