Thursday, 31 May 2012

सफरचंद -ब्रेड स्वीट बॉल्स

सफरचंद -ब्रेड स्वीट बॉल्स

साहित्य :- साल काढून बारीक चिरलेले सफरचंद १ वाटी , कडा काढलेल्या ब्रेडच्या स्लाईसेस ४-५ ,साखर  ३-४ चमचे ,थंड दुध , कुस्तार्द पावडर ४ चमचे/ बासुंदी मिक्स पावडर ५ चमचे ,ट्रूटी-फ्रुटी २ चमचे , ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी

कृती :-
बॉल्स साठी
१) प्रथम ब्रेडच्या स्लाईसेस दुधामध्ये थोडा वेळ बुडवाव्यात आणि नंतर प्रेस करून बाजूला ठेवाव्यात .सगळ्या स्लाईसेस साठी हीच कृती करावी.
२) एका बाउल मध्ये सफरचंदाचे काप,  निम्मे ट्रूटी-फ्रुटी- ड्रायफ्रुट्स घ्यावेत .
३) वरील सफरचंदाचे मिश्रण ब्रेडमध्ये  अलगद  भरावे (पुरण पोळीला जसे पुरण भरतो तसे ब्रेडमध्ये भरावे ).
४) तयार बॉल्स फ्रीज मध्ये ३-४ तासांकरता सेट करण्यास ठेवावेत .

 दुध 

 १) थंड दुधामध्ये कस्टेरड किंवा बासुंदी मिक्स,साखर  घालून छान उकळी काढावी. हे दुध जास्त घट्ट ठेवू नये .फ्रीज ला थंड करण्या साठी ठेवून द्यावे .

सर्व्ह

१) तयार  बॉल्स बरोबर मध्ये कट करून २ समान भाग करावेत .. ( कलर ची  ट्रूटी-फ्रुटी घातल्यामुळे खूप छान दिसते ). ह्या वर वरील दुध भरपूर प्रमाणात घालावे .आणी वरून ट्रूटी-फ्रुटी-ड्रायफ्रुट्स  घालून सजवावे .

टीप :-
१) दुध तयार झाल्यावर जरा टेस्ट करून पाहावे चवीनुसार त्यात थोडी साखर घालावी .