Saturday, 2 June 2012

भेंडी फ्राय

भेंडी फ्राय

साहित्य :- भेंडी १०-१२, कॉर्नफ्लोअर २-३ चमचे, बेसन ४चमचे ,मीठ चवीनुसार ,लाल तिखट १ चमचा , आले-लसून पेस्ट १ चमचा , आमचूर पावडर १ चमचा ,तळण्यासाठी तेल

कृती :-
१) प्रथम भेंडीचे पातळ काप करून घ्यावेत.
२) त्यानंतर भेंडीला मीठ लावून १० मिनिट ठेवून द्यावे .
३) भेंडीला मिठाचे पाणी सुटल्यानंतर त्यात एक - एक करून वरील सर्वे साहित्य घालावे .सगळे एकसारखे लागल्यानंतर तेलात डीप फ्राय करावेत.

टीप :-
१) वरील कृतीत पाणी वापरू नये जर गरज वाटलीच तर अगदी किंचित घालावे.नाहीतर भेंडी कुरकुरीत नाही होणार..