Wednesday, 26 September 2012

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक
साहित्य :-
उकडी साठी :-
 २ वाटी तांदुळाची पिठी , १ वाटी गरम पाणी, चीमुठभर मीठ , २ चमचे तूप

सारणासाठी :-
१ वाटी ओले खवलेले खोबरे , १/२ वाटी किसलेला गुळ , १ चमचा खसखस पावडर , चिमुटभर वेलची पावडर , चिमुटभर जायफळ पावडर


कृती :-
१) जितके तांदुळाचे पीठ असेल तितकेच नेहमी पाणी घ्यावे . पाण्याला चांगली उकली आली कि त्यात चवीनुसार मीठ,२ चमचे तूप/तेल , घालून त्यात मग हळू हळू तांदुळाची पिठी घालावी.आणि छान रवीच्या मागच्या बाजूने छान एकजीव करत उकड काढून घ्यावी. वर झाकण ठेवून छान वाफ येवू द्यावी.
२) तयार गरम उकड एक डीश मध्ये घेवून गरम पाणी व तुपाच्या सहायाने छान मळून घ्यावी.
३) नंतर तयार मळलेल्या उकडीचा एक मोठा गोळा घ्यावा आणि पिठीच्या सहायाने त्याची पारी करावी, त्याच्या छान चुण्या कराव्यात आणि मग त्यात बसेल इतके सारण भरावे आणि मोदक हळूहळू वळत बंद करावा. अशा प्रकारे सगळे मोदक करून घ्यावेत .
४) मोदक पत्रात सुती कापड ओले करून ठेवावे आणि त्यात हे मोदक ठेवून १०-१५ मिन. वाफवून घ्यावेत.